नमस्कार मित्रांनो आज महिन्याचा पहिला दिवस, 1 डिसेंबर. आजपासून नव्या महिन्याला सुरुवात झाली आहे. पण आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतात आणि त्याअंतर्गत इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं गॅसच्या किमती वाढवल्या आहेत.ही वाढ 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी करण्यात आली आहे. घरगुती एलपीजीच्या किमतींत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 16.50 रुपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 1818.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे.मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांत 16.50 रुपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 1771 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे.चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 16 रुपयांनी वाढली असून ती 1980.50 रुपये प्रति सिलेंडरवर आली आहे.
कोलकातामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 15.50 रुपयांनी वाढली असून ती 1927 रुपये प्रति सिलेंडरवर आली आहे.