नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या अर्जदारांपैकी पात्र असलेल्या 1 कोटी 8 लाख महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 हजार रुपये पाठवण्यात आले.
इथे क्लिक करून बघा या तारखेला होणार खात्यात पैसे जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पुण्यात पार पडला होता. त्यावेळी 1 कोटी 8 लाख महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये पाठवले होते. आता नागपूरमध्ये दुसरा राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आलेली आहे.