नमस्कार मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अनेक अडचणी येत आहेत. बँकेमध्ये खाते नसणे, खाते आधार लिंक नसणे या अडचणीमुळे महिलांना अर्ज भरता येत नव्हते. त्यात सरकारने 31 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. परंतु आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे(Aditi Tatkare ) यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर 2024 मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे तटकरे यांनी जाहीर केली
इथे क्लिक करून बघा या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती.