Home Loan EMI Calculator:नमस्कार मित्रांनो भारतात घर खरेदीसाठी गृह कर्ज घेणं ही सर्वसामान्य गोष्ट ठरली आहे. अनेक जण घर खरेदीसाठी गृहकर्ज हा सोपा पर्याय मानला जातो.
महिलांना मिळणार 0 टक्के व्याजदरावरती कर्ज येथे क्लिक करून अर्ज करा
जर तुम्ही 50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलं तर तुम्हाला दरमहा किती हप्ता भरुन कर्जाची परतफेड करावी लागेल.किती ईएमआय द्यावा लागेल हे समजल्यास महिन्याचं बजेट ठरवता येईल. जर 50लाख रुपयांचं कर्ज गृहकर्ज काढल्यास किती वर्ष आणि किती ईएमआय द्यावा लागेल हे समजून घेणं आवश्यक आहे
महिलांना मिळणार 0 टक्के व्याजदरावरती कर्ज येथे क्लिक करून अर्ज करा
.गृहकर्ज हे सुरक्षित कर्ज मानलं जातं. कारण तुम्हाला यामध्ये एका निश्चित काळासाठी वित्तपुरवठा केला जातो. त्याची परतफेड ईएमआयच्या रुपात परतफेड करावी लागते. गृहकर्जाच्या परतफेडीचा हप्ता तीन मुद्यांवर ठरतो. मुद्दल(P), व्याजदर (R) आणि कर्जाचा कालावधी(N) हे तीन प्रमुख घटक आहेत. सध्या 8.10 टक्के ते 12.50 टक्के व्याज गृहकर्ज आकारलं जातं.
Home Loan EMI Calculator
EMI कसा ठरतो?
EMI निश्चित करण्याच सूत्र
EMI = [P x R x (1+R)^N] / [(1+R)^N-1]
इथं-
P = मुद्दल (50 लाख)
R = मासिक व्याज दर (वार्षिक व्याजदराचा 12 टक्क्यानं भागाकर करा)
N = कर्जाचा कालावधी महिन्यांमध्ये(वर्षांच्या संख्येचा 12 नं गुणाकार करा)
व्याज दर आणि कर्ज कालावधी
भारतात साधारणपणे गृहकर्जाचा कालावधी 8.5 टक्के ते 12 टक्क्यांदरम्यान असतो. हा दर क्रेडिट स्कोअर, कर्ज देणारी संस्था आणि बाजारातील स्थितीवर अवलंबून असतो. कर्जाचा कालावधी 10 ते 30 वर्षांदरम्यान असू शकतो. ज्यामध्ये 20 वर्षांचा कालावधी अनेक जण घेतात
50 लाखांच्या कर्जासाठी मासिक हप्ता किती असेल?
व्याजाचा दर 9 टक्के आणि कर्जाचा कालावधी 20 वर्ष म्हणजेच 240 महिने ग्राह्य धरल्यास
मुद्दल (P) = 50,00,000
वार्षिक व्याजदर = 9 टक्के
मासिक व्याज दर (R) = 9%/12 = 0.75% किंवा 0.0075
कर्ज कालावधी (N) = 20 वर्ष x 12 = 240 महिने
फॉर्म्युला वापरल्यास
EMI = [50,00,000 x 0.0075 x (1+0.0075)^240] / [(1+0.0075)^240-1]
या हिशोबानं मासिक हप्ता 44,986 रुपये इतका येतो.