या शेतकऱ्यांना 2000 जमा
निर्णयानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये लवकरच जमा होतील, असं शासनाच्या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. यामुळे मागील हप्त्यांतून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनाही रक्कम दिली जाईल.नमो शेतकरी योजना सन 2023-24 पासून लागू करण्यात आली असून, तिचा उद्देश पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून अतिरिक्त आर्थिक आधार देण्याचा आहे.
आतापर्यंत ऑक्टोबर 2024 पर्यंत या योजनेद्वारे 91.45 लाख शेतकऱ्यांना थेट बँक खात्यांमध्ये 9055.83 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान नमो शेतकरी योजनेचे वार्षिक अनुदान 6000 रुपयांवरून 9000 रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं.
येथे पहा यादीत आपले नाव
त्यानुसार, पीएम किसानच्या 6000 आणि नमो शेतकरी योजनेचे 9000 रुपये मिळून एकूण 15000 रुपये वार्षिक लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.महाराष्ट्राच्या कृषी विभागामार्फत या संदर्भातील शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हफ्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत.
येथे पहा शासन निर्णय
महायुती सरकारने 2023-24 च्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली होती. केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या हफ्त्यासोबतच नमो शेतकरी सन्मान योजनेचा हफ्ता दिला जात होता