नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत (CM Solar Agricultural Pump Scheme) १ लाख सौरऊर्जेवर चालणारे कृषी पंप अनुदानित दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
येथे क्लिक करून बघा अर्ज प्रक्रिया
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पारंपरिक विजेवरील अवलंबन कमी करणे शक्य होईल, यासह डिझेलच्या खर्चातूनही त्यांना दिलासा मिळणार आहे.अनुदानित दरात सौर पंप – शासनाच्या योजनेनुसार, शेतकऱ्यांना सौर पंप खरेदीसाठी ९० ते ९५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. यामुळे डिझेल आणि विजेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे.
२) दिवसा सिंचनाची सुविधा – या सौर पंपांमुळे शेतकऱ्यांना दिवसाही सिंचन करता येईल, त्यामुळे रात्रीच्या विजेच्या प्रतीक्षेचा त्रास होणार नाही.३) दुर्गम व आदिवासी भागांना प्राधान्य – राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागांतील शेतकऱ्यांना या योजनेत प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे, जेथे अद्यापही वीज पोहोचलेली नाही.४) अतिरिक्त सुविधा – सौर पंपांसोबतच २ डीसी एलईडी बल्ब, १ पंखा आणि मोबाईल चार्जिंग सॉकेट देण्यात येणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवनही सुकर होईल.