त्याचप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजनेचा (Namo shetkari sanman yojana) दरमहिना १००० रुपये लाभ घेणाऱ्या सुमारे ७.७ लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून उर्वरित फक्त ५०० रुपयांचाच सन्मान निधी मिळणार आहे. यामध्ये एकाही पात्र महिलेला योजना बंद करण्यात आलेली नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

योजनेबाबत विरोधकांकडून सातत्याने अपप्रचार करण्यात येतो आहे, असे म्हणत अदिती तटकरे (aditi tatkre) यांनी या मुद्यावर सरकारची बाजू मांडली. त्यांनी विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले असून त्याची नोंदही घेतलेली आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या भगिनींनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही तटकरे यांनी म्हटले. या योजनेंतर्गत महिलांना दरमहिना स्थिर सन्मान निधी देण्याचा उद्देश कायम ठेवण्यात आलेला असून शासन धोरणात कोणताही गोंधळ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.