ज्या महिलांना तांत्रिक अडचणी आल्या असतील अशा महिलांना एप्रिलमध्ये ३००० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली होती. मात्र निवडणुकीच्या काळात महिलांना २१०० रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन महायुती कडून अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. असे असले तरी दरमहा १५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होत आहे.एप्रिल महिन्याचे पैसे देखील आता महिलांच्या खात्यात जमा होणार असून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. अक्षय तृतीया ३० एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे या मूहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत काही महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत. ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांची नावे या योजनेतून बाद करण्यात आली आहे.