शेअर्समध्ये 32% वाढीचा अंदाज
ब्रोकरेज फर्म YES Securities ने VA Tech Wabag च्या शेअर्सवर BUY रेटिंग देत कव्हरेज सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या शेअर्ससाठी आगामी 12 महिन्यांत 1,750 चा टार्गेट प्राइस ठरवण्यात आला आहे. जो सध्याच्या किमतीच्या तुलनेत 32% वाढ दर्शवतो.
YES Securities ने दिलेल्या अहवालानुसार
भारत आणि मध्य पूर्वेतील वाढत्या मागणीचा फायदा VA Tech Wabag ला होणार आहे.
>कंपनीकडे 14,300 कोटींची ऑर्डर बुकिंग असून, पुढील 3-4 वर्षांसाठी स्थिर महसूल मिळण्याची शक्यता आहे.
>FY26 आणि FY27 मध्ये कंपनीच्या महसूल वाढीचा अंदाज अनुक्रमे 18% आणि 19% असा आहे.
>कंपनीचा नेट कॅश फ्लो मजबूत झाला आहे आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडी कायम आहे.
450 घनमीटर प्रतितास क्षमतेचा अल्ट्रा-फिल्ट्रेशन (UF) आणि रिव्हर्स ऑस्मोसिस (RO) आधारित इफ्लुएंट रिसायकल प्लांट
>झिरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD) प्लांट
>नवीन वेस्टवॉटर ट्रीटमेंट प्लांट
>उत्तर प्रदेशमधील GAIL च्या पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समधील विद्यमान वेस्टवॉटर प्लांटचे अद्ययावत करण्याचे काम
रेखा झुनझुनवाला यांचा कंपनीत 8.04% हिस्सा
दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे VA Tech Wabag मध्ये 8.04% हिस्सा आहे. डिसेंबर 2024 तिमाहीत, त्यांच्याकडे 50,00,000 शेअर्स होते.
कंपनीच्या प्रमोटर्स आणि प्रमोटर ग्रुपकडे 19.13% शेअर्स, तर सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे 80.87% शेअर्स आहेत