यामुळे पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी होईल आणि पर्यावरणपूरक उपाययोजना शक्य होतील. तसेच, घरगुती ग्राहकांसाठी मोठी घोषणा करत 1 कोटी 34 लाख ग्राहकांना मोफत वीज देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विजेच्या किंमतीतील वाढ रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. राज्यातील वीजपुरवठा सुधारण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून 2030 पर्यंत महाराष्ट्रातील 52% वीज अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून तयार केली जाणार आहे. यात सौरऊर्जा, पवनऊर्जा आणि अन्य नवीकरणीय स्रोतांचा समावेश असणार आहे.

सर्व स्वयंचलित वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या एचएसआरपी नंबरप्लेटच्या किमती इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याचा दावा करण्यात आला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “देशात सर्वात महाग एचएसआरपी नंबरप्लेट महाराष्ट्रात विकल्या जात आहेत, असा एचएसआरपी नंबरप्लेटबाबत एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला. खरंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे याची अंमलबजावणी आपल्याला आधीच करायची होती. दरम्यान, या एचएसआरपी नंबरप्लेटच्या अंमलबजावणीबाबत आपण मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. त्यांनी इतर सदस्यांसोबत मिळून या नंबर प्लेटबाबत जे काही दर आले होते. त्याचं मूल्यमापन करून अंतिम दर निश्चित केले आहेत.”