लाडकी बहीण योजनेत अर्जांच्या पडताळणीनंतरच महिलांना पैसे देणार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, ही पडताळणी ५ टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. त्यातील काही अर्जांची पडताळणी झालेली आहे. यातून आतापर्यंत ९ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. एकूण ५० लाख महिलांचे अर्ज बाद करण्याची शक्यता आहे.लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. यामागे दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे महिलांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नाही. आणि दुसरं कारण म्हणजे काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा न झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारण, मध्यंतरी एका कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितले होते की,लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या चेकवर सही करुन आलोय. आठ दिवसांत पैसे येतील. मात्र, अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.