ई-पॅन कार्ड कसे तयार करावे
आधी तुम्हाला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
आता पेज स्क्रोल करून तळाशी इन्स्टंट ई-पॅन कार्डचा पर्याय दिसेल.त्यावर क्लिक करा.
यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, ज्याच्या डाव्या बाजूला instant E-PAN चा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल.
यानंतर तुम्हाला तुमच्या आधारकार्डचा १२ अंक नंबर टाकावे लागतील.
त्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या ‘I confirm that’ पर्यायावर टॅप करावे लागेल.
यानंतर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाकून व्हेरिफिकेशन करा.
यानंतर ई-मेल आयडी टाकून पॅन कार्डसाठी आवश्यक असलेली तुमची संपूर्ण माहिती भरून घ्या.
फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काही वेळाने कन्फर्मेशन नंबर मिळेल. तुम्ही भरलेली माहिती तपासून घ्या. माहिती बरोबर असेल तर तुम्हाला डाऊनलोड ऑप्शनच्या माध्यमातून पॅन नंबर मिळेल. या पॅनचा वापर तुम्ही रेग्युलर पॅन म्हणून करू शकता.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, ई-पॅन कार्डसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स वेबसाइटवर जावे लागेल. जिथे तुम्हाला ‘चेक स्टेटस/डाउनलोड पॅन’ ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. अशाप्रकारे पॅन कार्ड PDF मध्ये डाउनलोड होईल.