मुख्यमंत्री शिंदेंनी कोणते १० आश्वासन दिले?
-लाडक्या बहिणींना १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये देण्याचं आश्वासन.
– २५ हजार महिलांची पोलीस दलात भरती करण्याचं आश्वासन.
– शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेसह राज्य आणि केंद्राचे मिळून आता १५ हजार करणार.
– तसेच एमएसपीवर २० टक्के अनुदान देण्याचं आश्वासन आम्ही देत आहोत.
– वृद्ध पेन्शन योजनेमध्ये आता १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये करण्यात येणार आहेत.
– २५ लाख रोजगार निर्मिती करण्याचं काम आम्ही करणार आहोत, तसेच १० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचं आश्वासन.
२५ हजार गावात रस्ते बाधण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. शहराच्या विकासाबरोबरच गावाचाही विकास
करण्याचं आश्वासन
– अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५ हजार आणि विमा सुरक्षा देण्याचं आश्वासन.
– विजबिलामध्ये ३० टक्के कपात करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत.
– महायुतीचं सरकार आल्यानंतर ‘व्हिजन २०२९’ हे १०० दिवसांच्या आत सादर करण्याचं आश्वासन.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची आज एकत्र कोल्हापूरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० प्रमुख आश्वासने मुख्यमंत्री शिंदे यांनी वाचून दाखवली.