कोणत्या पात्र महिलेला 3000 रुपये मिळणार आणि कोणत्या महिलेला 4500 रुपये मिळणार? यासंदर्भात अनेक महिलांचा गोंधळ होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यात चालू झाली. ऑगस्ट महिन्यात या योजनेचा पुण्यातील एका कार्यक्रमात अधिकृतरित्या शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याच्या हिशोबाने पहिल्या टप्प्यात पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदर 3000 रुपये देण्यात आले. या पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत अर्ज भरलेल्या महिलांना पैसे देण्यात आले होते.तुम्ही जर ऑनलाईन बँकिंग सेवा घेतली असेल तर बँकेच्या अॅपच्याद्वारे बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही? हे तपासू शकता. तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले तर तुमचा मोबाईल नंबर जर आधारकार्ड आणि बॅंक खात्याशी जोडलेला असेल तर तुम्हाला बॅंकेचा संदेश येईल.