त्यामुळे जर तुम्हाला हे पैसे बँकेत जमा करून घ्यायचे असतील तर तुम्हाला एनपीसीआय फॉर्म (NPCI Form)भरावा लागणार आहे. हा फॉर्म बँकेत सादर केल्यावर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक होते आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होणार आहे.

 

NPCI आधार सीडिंग संदर्भातील प्रोसेस कशी असते?

NPCI हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन किंवा बँकेत मिळणार आहे.

फॉर्मवर तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो सुद्धा चिटकवीने आवश्यक आहे.

बँकेचे नाव, बँक शाखेचे नाव, तुमचा खाते क्रमांक, खातेदार यांची सही आणि खातेदाराचे नाव फॉर्मवर लिहायचे आहे.

आधार कार्ड आणि बँक पासबुकचे झेरॉक्स तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायचे आहेत.

फॉर्म तुम्हाला बँक शाखेत जमा करून द्यायचा आहेत.

ही प्रोसेस बँकेकडून पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.