राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री महोदय काल पुण्यात एका कार्यक्रमासाठी हजर होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात लाडक्या बहिणींसाठी एक मोठी घोषणा केली.

ते म्हणालेत की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे. उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही बळ दिलं तर दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील. दोन हजार होतील, अडीच हजार होतील, अडीच हजाराचे तीन हजार होतील.या सरकारची ताकद वाढली, तीन हजारापेक्षा जास्त देण्याची ताकद आली, तर आम्ही हात आखडता घेणार नाही. सरकार तुमचं आहे. देण्याची नियत लागते, दानत लागते. ती आमच्या सरकारकडे आहे.”

म्हणजेच आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत जर महायुती सरकार सत्तेवर आले तर लाडक्या बहिणींना दीड हजारापेक्षा अधिकची रक्कम दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या विधानाची आणि घोषणेची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.