या बैठकीनंतर मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. 31 ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही माहिती देत असताना यावेळी महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना 17 ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. आतापर्यंत जवळपास 1 कोटी 35 महिला पात्र ठरल्या असून त्यांच्या खात्यात 17 ऑगस्ट रोजी पैसे जमा होणार आहेत. ज्यांचे बँक खाती आधार कार्डशी लिंक नाहीत, त्यांची खाती लिंक करून झाल्यानंतर बँक खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.