तसेच, महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या आपल्या भाषणातून या योजनेबाबत जनजागृती करत असून विरोधकांच्या टीकेलाही उत्तर देत आहेत.बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. 3-4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनचे पवित्र औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे.
31 जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम, प्रत्येकी 3000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. 31 जुलै नंतर अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे, असे ट्विट आमदार सातपुते यांनी केले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना चालू होऊन एक महिनाही झालेला नाही. राज्यात 1 कोटी 40 लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. शासन-प्रशासनाच्या मेहनतीमुळं हे शक्य झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.